spot_img

Kuldeep Yadav : चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव चढणार बोहल्यावर; कानपूरच्या ‘वंशिका’सोबत रंगणार शाही विवाह सोहळा!

spot_img

मसुरीच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडणार लग्न; खास ‘पहाडी’ मेजवानी ठरणार आकर्षणाचे केंद्र

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी जादूगार कुलदीप यादव आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. कुलदीप आणि त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका उद्या, १४ मार्च २०२६ रोजी मसुरी येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. वंशिका मूळची कानपूरची असून सध्या ती ऑस्ट्रेलियात कार्यरत आहे. या दोघांनी ५ जून २०२५ रोजी लखनौमध्ये साखरपुडा उरकला होता. आज १३ मार्च रोजी त्यांचा हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम थाटामाटात पार पडत असून, चाहत्यांमध्ये या लग्नाची मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हा विवाह सोहळा मसुरीतील प्रसिद्ध ‘हॉटेल सवाय’सह इतर आलिशान हॉटेल्समध्ये संपन्न होणार आहे. या शाही लग्नासाठी केवळ २०० खास पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नातील जेवणाची थाळी विशेष चर्चेत असून, एका प्लेटची किंमत ६००० रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समजते. पाहुण्यांसाठी मडुवा रोटी, लाल तांदूळ, कंदली साग आणि झांगोरा खीर यांसारख्या अस्सल पहाडी पदार्थांची मेजवानी खास आकर्षण असणार आहे.

लग्नानंतर १७ मार्च रोजी लखनौमध्ये एका भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे, जिथे क्रिकेट विश्वातील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर सध्या कुलदीप आणि वंशिकावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या या ‘फ्रेंडशिप टू मॅरेज’ प्रवासाची सर्वत्र चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ