ओतूर,प्रतिनिधी:दि.१२ मार्च ( रमेश तांबे )
जुन्नर आंबेगाव तालुक्यातील मंदिरातील दानपेट्या फोडून, दानपेटीतील रोख रकमेसह इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या असून, आरोपींकडून चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणून, आरोपींकडून १ लाख १९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.
सुनील सुरेश आगिवले वय २० वर्षे, रा. कळस खा. ता. अकोले, जि. अहिल्यानगर, २) भिमा भाऊसाहेव गिन्हे वय २६ वर्षे रा. नांदूर शिगोटे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, मुळ रा. कोतूळ ता. अकोले अशी आरोपींची नावे आहेत. आळे गावातील खंडोवा मंदिरात दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रीच्या वेळी दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम, सोन्याच्या व चांदीचा मुलामा असलेले दागिने चोरीला गेले होते याबाबत शांताराम गोपाळा भुजबळ वय ६७ वर्षे धंदा शेती रा.आळे चिचकाईमळा ता.जुन्नर जि.पुणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मागील दोन महिन्यात जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती, त्यामध्ये आळे गावातील श्री खंडोवा मंदिर, शिरोली बु।। येथील श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथील श्री. साईबाबा मंदिर, नळवणे गावातील श्री खंडोबा मंदिर, मंचर शहरालगतचे कळंबा माता मंदिर, जुन्नर धालेवाडी येथील श्री शिवशंभू मंदिर, रांजणगाव गणपती गावाजवळील श्री सोमेश्वर मंदिर, अशा मंदिरांमधील दानपेटी फोडून रोख रक्कम व भाविकांनी केलेले दान, तसेच मंदिरातील इतर मौल्यवान साहित्य चोरी गेले होते. पोलीस अधीक्षक श्री. साो. पुणे ग्रामीण यांना संपर्क करून विनंती केली आहे.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करणेकामी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे अखत्यारीत एक तपास पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिळीमकर यांनी जुन्नर व खेड विभागातील पथकातील अधिकारी व अंमलदर यांचे समवेत सर्व गुन्ह्यांच्या
घटनास्थळांना भेट दिली. पथकाला योग्य सुचना करून सीसीटीव्ही फुटेज, गुन्हे कार्यपद्धत, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करण्याबाबत सांगितले. स्था.गु.शा.चे पथकाने सर्व मंदिर चोरीचे गुन्हयातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज पडताळले असता, सर्व गुन्ह्यांमध्ये
एकाच वर्णनाचे आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखविणेत आले, दि.३ मार्च रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीचे आधारे आरोपी सुनील आगिवले व भिमा गिन्हे यांना पुणे नाशिक हायवेवरील कांदळी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले आहे, त्याचप्रमाणे त्यांचे कडून गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल, कटावणी, स्कु डायव्हर, सो, रोख रक्कम, चांदीचे पादुका असा एकूण १ लाख १९ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
गुन्ह्यातील आरोपींना मा.न्यायालयात हजर करण्यात आले असून, आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सदरची कार्मागरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्था.गु.शा.चे सपोनि महोदव शेलार, पोलीस अंमलदार दिपक सावळे, संदिप वारे, अक्षय नवले, राजु मोमीन, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सपेकर समाधान नाईकनवरे, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम यांनी यांनी केली आहे.




