spot_img

Vishakha Subhedar : विशाखा सुभेदार यांच्या मुलाची मृत्यूच्या दाढेतून सुटका! कुवेतमध्ये मिसाईल्सच्या वर्षावात अडकलेल्या ३० भारतीयांचे सुरक्षित पुनरागमन

spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परराष्ट्र मंत्रालयाचा धाडसी पुढाकार; ११ दिवसांच्या थरारानंतर अभिनय सुभेदार मायदेशी परतला.

मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या कुवेतमधून अखेर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा, अभिनय सुभेदार, ९ मार्च रोजी सुखरूप मुंबईत परतला आहे. अभिनय लंडनला जात असताना कुवेतमध्ये ट्रान्झिटसाठी थांबला होता, मात्र त्याच वेळी इराणने कुवेतवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केल्याने हवाई क्षेत्र बंद झाले. आकाशात फुटणारी मिसाईल्स आणि बॉम्बस्फोटांच्या आवाजांत अभिनयसह अनेक महाराष्ट्रीयन नागरिक तिथे अडकून पडले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर अश्रूंनी दाटलेला व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची आर्त हाक दिली होती.

या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. व्हिसाच्या तांत्रिक अडचणींमुळे हे नागरिक कुवेतमध्येच अडकले होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पावले उचलत त्यांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून दिला. ७०० किलोमीटरचा धोकादायक रस्ते प्रवास करून हे ३० नागरिक रियाधला पोहोचले आणि तिथून विशेष विमानाने त्यांना मुंबईत आणण्यात आले. “मी प्रत्यक्ष डोळ्यांनी मिसाईल्स फुटताना पाहिले, पण सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळेच मी आज जिवंत आहे,” अशा शब्दांत अभिनयने आपला थरारक अनुभव कथन केला.

मुलाला पाहताच विशाखा सुभेदार भावूक झाल्या असून त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाचे आभार मानले आहेत. युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ