spot_img

T20 World Cup Final : भारतीय पोलिसांची ‘गुगली’! टीम इंडियाच्या फटकेबाजीवर दिल्ली, अहमदाबाद अन् युपी पोलिसांची जुगलबंदी!

spot_img

टी-२० विश्वचषक २०२६: मैदानावर फलंदाजांचा धुमाकूळ, तर सोशल मीडियावर पोलिसांच्या भन्नाट ट्विट्सनी जिंकली चाहत्यांची मनं!

नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष देशभरात साजरा होत असतानाच, सोशल मीडियावर मात्र वेगळीच ‘मॅच’ रंगली होती. ही मॅच होती दिल्ली, अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांमध्ये! भारतीय फलंदाजांनी जेव्हा किवी गोलंदाजांची पिसं काढायला सुरुवात केली, तेव्हा या तिन्ही राज्यांच्या पोलीस दलांनी केलेल्या मिश्किल ट्विट्सनी इंटरनेटवर एकच हशा पिकवला.

या मजेशीर संवादाची सुरुवात केली ती दिल्ली पोलिसांनी. जेव्हा चेंडू वारंवार सीमारेषेबाहेर जात होता, तेव्हा दिल्ली पोलिसांनी अहमदाबाद पोलिसांना टॅग करत ट्विट केले की, “प्रिय अहमदाबाद पोलीस, न्यूझीलंडच्या संघाने चेंडू वारंवार हरवत असल्याची तक्रार केली आहे. पण कृपया ती गांभीर्याने घेऊ नका, कारण भारतीय फलंदाज तो चेंडू सारखा स्टेडियमबाहेर धाडत आहेत!” यावर अहमदाबाद पोलिसांनीही तितक्याच तत्परतेने उत्तर दिले की, “आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेतली असून ती वरिष्ठांकडे सोपवली आहे.”

हा खेळ तिथेच थांबला नाही; यात उत्तर प्रदेश पोलिसांनीही उडी घेतली. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या ट्विटला उत्तर देताना बुमराहच्या घातक गोलंदाजीवर निशाणा साधला. युपी पोलिसांनी लिहिले की, “आता तक्रारीचे स्टेटस अपडेट झाले आहे. आधी फक्त चेंडू गायब होत होता, आता तक्रार आली आहे की आमचे (न्यूझीलंडचे) फलंदाजच मैदानावरून गायब होत आहेत! आणि आमच्या मते या सगळ्यामागे टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचा हात असावा.” खाकी वर्दीतील या अधिकाऱ्यांच्या मिश्किल अंदाजाने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून, या पोलीस दलांच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ