spot_img

Trisha Krishnan : तमिळ सुपरस्टार विजय आणि त्रिशा पुन्हा चर्चेत; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान एकत्र दिसल्याने रंगल्या चर्चा

spot_img

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय थलपती सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर विजयचे अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निर्माते कल्लापथी एस. सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये विजय आणि त्रिशा एकत्र दिसल्याने सोशल मीडियावर चर्चांना आणखी उधाण आले आहे. या कार्यक्रमातील त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अहवालांनुसार, जवळपास 26 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेत संगीता यांनी चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात येथे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विजय आणि त्रिशा एकत्र दिसल्याने चर्चांना अधिकच रंग चढला आहे. या सर्व घडामोडींमध्ये त्रिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्टही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापूर्वी विजयच्या बॉडीगार्डनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र नंतर ती पोस्ट हटवून “सर्व अफवांना थारा न देण्याची वेळ आली आहे” असा संदेश देण्यात आला.

या सर्व चर्चांदरम्यान विजय आणि त्रिशाकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या अफवांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत चाहत्यांमध्ये अजूनही उत्सुकता कायम आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ