spot_img

Mumbai Feriwala Attack : कांदिवलीत फेरीवाल्यांचा पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला

spot_img

12-13 जणांवर गुन्हा, काही कर्मचाऱ्यांना दुखापत.

मुंबईच्या कांदिवली परिसरात शुक्रवारी संध्याकाळी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात कारवाईसाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही फेरीवाल्यांनी आणि जमावाने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत काही पालिका कर्मचारी जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पालिकेचे कर्मचारी अनधिकृत स्टॉल हटवण्याची कारवाई करत असताना जमावाने त्यांना घेरून मारहाण केल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी 12 ते 13 जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून त्यापैकी चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दरम्यान, स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी काही हल्लेखोर मुस्लिम आणि बांगलादेशी असल्याचा आरोप करत हा मुद्दा विधानसभेतही मांडल्याचे सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला अजिबात सहन केला जाणार नाही आणि या प्रकरणावर कडक भूमिका घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ