spot_img

Akshar Patel : अक्षर पटेलच्या एका कॅचने फिरवला सामना जाणून घ्या ‘बापू’ची एकूण संपत्ती आणि आलिशान लाईफस्टाईल

spot_img

इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर स्टार अष्टपैलू अक्षर पटेलच्या वैयक्तिक आयुष्याची जोरदार चर्चा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या रोमहर्षक उपांत्य सामन्यात भारतीय संघाने थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात धावसंख्येपेक्षाही दोन्ही संघांमधील क्षेत्ररक्षणाचा (Fielding) फरक निर्णायक ठरला. इंग्लंडला संजू सॅमसनला दिलेले जीवदान महागात पडले, तर दुसरीकडे भारतीय अष्टपैलू अक्षर पटेलने सीमारेषेवर टिपलेल्या एका विस्मयकारक झेलने सामन्याचे पूर्ण चित्र पालटले. इंग्लंडचे बेथल आणि जॅक्स ही जोडी जेव्हा भारतीय गोलंदाजांना डोकेदुखी ठरत होती, तेव्हा अक्षरच्या चपळाईमुळे जॅक्सला बाद करण्यात भारताला यश आले. अक्षरच्या या अफलातून कामगिरीनंतर सोशल मीडियावर तो प्रचंड प्रकाशझोतात आला असून, क्रिकेटप्रेमींमध्ये त्याच्या मैदानाबाहेरील आयुष्याबद्दल आणि विशेषतः त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अक्षर पटेलची पत्नी मेहा पटेल ही एक यशस्वी आहारतज्ज्ञ (Nutritionist) आणि उद्योजिका असून, ती मुळची गुजरातची आहे. संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर काम करणारी मेहा सहसा प्रसिद्धीझोतात येणे टाळते. २०२३ मध्ये या दोघांचा विवाह झाला असून, २०२४ मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर आर्थिक बाबतीतही अक्षरने मोठी प्रगती केली आहे. २०२६ पर्यंत त्याची एकूण संपत्ती अंदाजे ६० ते ६५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला १६.५ कोटी रुपयांना रिटेन केले असून, बीसीसीआयच्या करारानुसार आणि प्रति मॅच शुल्कातून तो वर्षाला सुमारे ३ ते ४ कोटी रुपये कमावतो. याशिवाय बोट आणि अपोलो यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतूनही त्याला मोठी मिळकत होते. त्याच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्वर आणि लँड रोव्हर यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश असून, तो आता भारतीय संघाचा एक महत्त्वाचा ‘मॅच विनर’ ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ