spot_img

Anurag Dobhal Viral Video : “माझ्या मृत्यूला माझेच कुटुंब जबाबदार असेल”; प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभालचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!

spot_img

आंतरजातीय विवाह, घरच्यांचा छळ आणि नैराश्य; ‘UK07 Rider’ ने जाहीर केला युट्यूबला कायमचा रामराम

प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस १७’ फेम अनुराग डोभाल (The UK07 Rider) याने आपल्या आयुष्यातील अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या संघर्षाचा खुलासा केला आहे. नुकत्याच पोस्ट केलेल्या दोन तासांच्या एका विस्तृत व्हिडीओमध्ये अनुरागने आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप करत, हा आपला शेवटचा व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे स्वतःच्या आई-वडिलांनी आणि भावंडांनी आपला प्रचंड मानसिक छळ केल्याचे सांगत, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

अनुरागने या व्हिडीओत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गुपिते उघड केली. पत्नी रितिकाशी झालेल्या ओळखीपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास त्याने मांडला. मात्र, हे लग्न घरच्यांच्या मर्जीविरुद्ध असल्याने लग्नाच्या सहा दिवस आधी आई-वडिलांनी पाठ फिरवली होती. “मला नातेवाईकांसमोर माफी मागायला लावली, अपमानित केले आणि लग्नानंतर घरात प्रवेशही नाकारला,” असे सांगताना अनुराग भावूक झाला होता. आई-वडील आणि बहिणीने आपल्याला जगणे कठीण केल्याचा आरोप करत, त्याने आपल्या संभाव्य मृत्यूला कुटुंबालाच जबाबदार धरले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून अन्नाचा कणही न घेतल्याने आणि प्रचंड नैराश्यात (Depression) असल्याने आपला मेंदू सुन्न झाला असल्याचे अनुरागने सांगितले. त्याने आपली पत्नी रितिकालाही एक भावनिक साद घातली आहे. “लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तू मला सोडून गेलीस, पण माझ्या पश्चात सत्यासाठी आणि आपल्या मुलासाठी नक्की लढ,” अशी कळकळीची विनंती त्याने केली आहे. अनुरागच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, त्याचे चाहते त्याच्या सुरक्षिततेसाठी चिंता व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ