spot_img

Janhvi Kapoor : माझ्या भावाला फक्त ‘बळीचा बकरा’ बनवलं जातंय; अर्जुन कपूरच्या ट्रोलिंगवर जान्हवी कपूर संतापली!

spot_img

सोशल मीडियावरील ‘क्लिकबेट’ संस्कृतीवर ओढले ताशेरे; भावाच्या शोषणाबद्दल व्यक्त केली खंत

सोशल मीडियाच्या जगात सेलिब्रिटींना ट्रोल करणे हा जणू एक ट्रेंड झाला आहे, आणि यात अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. कधी त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे, तर कधी मलायका अरोरासोबतच्या खाजगी आयुष्यामुळे त्याला सतत टीकेला सामोरे जावे लागते. यावर आता त्याची बहीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने मौन सोडले आहे. ‘ग्रेझिया’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने अत्यंत स्पष्ट शब्दांत ट्रोलर्सचा समाचार घेतला. ती म्हणाली की, “आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला फक्त ‘व्ह्यूज’ आणि ‘एंगेजमेंट’ हवी आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी लोक सेलिब्रिटींना केवळ ‘बळीचा बकरा’ बनवतात.”

जान्हवीने पुढे नमूद केले की, अर्जुनच्या नावाचा वापर करून केवळ ‘क्लिकबेट’ कंटेंट तयार केला जातो. जेव्हा ही टीका वैयक्तिक पातळीवर जाऊन मानसिक छळ (बुलिंग) किंवा शोषणाचे रूप घेते, तेव्हा खूप दुःख होते. “मी माझ्या भावासोबत हे सर्व घडताना जवळून पाहिलं आहे. अशा प्रकारच्या नकारात्मक वागणुकीला कोणतेही समर्थन असू शकत नाही,” असे सांगत तिने सोशल मीडियावरील या विखारी संस्कृतीवर ताशेरे ओढले. अर्जुनने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक भावूक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने आयुष्य कसं ‘निर्दयी’ बनलं आहे, याची जाणीव करून दिली होती. जान्हवीच्या मते, अशा नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवणे हाच एक मार्ग आहे, कारण द्वेष फक्त द्वेषालाच जन्म देतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ