spot_img

Ayesha Khan : ‘माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला…’; बिग बॉस फेम आयेशा खानचा हादरवणारा खुलासा!

spot_img

सोशल मीडिया ट्रोलिंग आणि सेटवरील छळाबाबत मांडली व्यथा; ‘धुरंधर’ अभिनेत्रीच्या डोळ्यांत पाणी

‘बिग बॉस १७’ मुळे घराघरांत पोहोचलेली आणि ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ गाण्याने तरुणाईला भुरळ घालणारी अभिनेत्री आयेशा खान सध्या एका खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच एका समिटमध्ये बोलताना आयेशाने ग्लॅमर विश्वामागील काळोखी बाजू मांडली. तिने अत्यंत भावूक होत सांगितले की, तिच्या आयुष्यात एकदा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. ही जखम आजही भरलेली नाही आणि ऑनलाइन मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्या वेदना पुन्हा ताज्या होतात. सार्वजनिक जीवनात वावरताना महिलांना कोणत्या थराला जाऊन मानसिक छळ सहन करावा लागतो, याचे दाहक वास्तव तिने जगासमोर ठेवले.

आयेशाने सांगितले की, तिला सोशल मीडियावर दररोज बलात्काराच्या धमक्या मिळतात आणि तिच्या कपड्यांवरून तिला अश्लील भाषेत ट्रोल केले जाते. “मी साधा टॉप घातला तरी लोकांना अडचण असते आणि स्कर्ट घातला तरीही. प्रत्येक पोस्ट करण्यापूर्वी मला लोकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो, हे दुर्दैव आहे,” अशा शब्दांत तिने आपली व्यथा मांडली. ‘शरारत’ गाण्याच्या शूटिंगवेळी मासिक पाळी असतानाही तिने काम केले, हे प्रामाणिकपणे सांगितल्यावरही तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले, ज्याचे तिला प्रचंड वैषम्य वाटले.

छळाचा हा प्रकार केवळ ऑनलाइन मर्यादित नसून प्रत्यक्ष सेटवरही तिला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्वतःचे वडील सोबत असतानाही, सेटवरील एका स्पॉटबॉयने तिला इन्स्टाग्रामवर अश्लील व्हॉइस नोट्स पाठवून त्रास दिला होता. आयेशाने तात्काळ तक्रार केल्यावर त्या व्यक्तीवर कारवाई झाली, मात्र या घटनेने ती पूर्णपणे हादरली होती. प्रवासात किंवा शूटिंगवर असताना पुन्हा तशीच दुर्दैवी घटना घडू नये, या भीतीच्या सावटाखाली तिला जगावे लागते, असेही तिने नमूद केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ