spot_img

Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce : सुपरस्टार थलपती विजयच्या संसारात मिठाचा खडा; पत्नी संगीताने ठोकला घटस्फोटाचा दावा!

spot_img

विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांमुळे तमिळ चित्रपटसृष्टीत खळबळ; राजकीय कारकिर्दीच्या उंबरठ्यावर वैयक्तिक आयुष्यात मोठे संकट

तमिळ चित्रपटसृष्टीचा दिग्गज अभिनेता आणि ‘तमिळनाडू वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाचा संस्थापक विजय थलपती सध्या वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे चर्चेत आला आहे. विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी लग्नाच्या २७ वर्षांनंतर चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. संगीताने विजयवर एका सह-अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करत आपला विश्वासघात झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. या मानसिक त्रासामुळे आता एकत्र राहणे शक्य नसल्याचे सांगत तिने पोटगी आणि राहत्या घरावर आपला हक्क मागितला आहे.

एकीकडे घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडिया हादरले असताना, विजयने मात्र या वादावर मौन बाळगत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्याने ‘एक्स’वर (ट्विटर) तमिळ भाषेत पोस्ट करत बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना धीर दिला. “माझ्या प्रिय लहान भाऊ-बहिणींनो, भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जा, विजय तुमचाच आहे,” अशा शब्दांत त्याने शुभेच्छा दिल्या. वैयक्तिक आयुष्यात एवढा मोठा पेच निर्माण झालेला असतानाही विजयने दाखवलेल्या या संयमाचे त्याचे चाहते कौतुक करत आहेत.

राजकीयदृष्ट्याही हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. विजय लवकरच आपला ६९ वा आणि शेवटचा चित्रपट ‘जन नायकन’ पूर्ण करून पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार आहे. मात्र, हा चित्रपट सध्या सेन्सॉरमध्ये अडकला असून दुसरीकडे घटस्फोटाच्या प्रकरणाने त्याच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९९८ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीचा संसार आता न्यायालयीन उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने दक्षिणेतील सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ