मुंबई, विजय गायकवाड
माझगाव येथे १९८२ साली एका देशी दारूच्या गुत्यावर किरकोळ कारणावरून वाद झाल्याने आरोपीने फिर्यादीस पोटात चाकू भोसकल्याने गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सदर आरोपीला १९८४ मध्ये मा. न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र आरोपी फरार झाला होता. मुंबई पोलिसांनी अथक प्रयत्न करून आरोपीला ४२ वर्षानंतर पायधूनी येथे सापळा रचून अटक केली. या बाबत परी-३चे पोलीस उपायुक्त शशिकांत भोसले यांनी प्रसारमध्यमानया अशी माहिती दिली की, माझगाव येथील जीएसटी भवन जवळील एका देशी दारू अड्यावर आरोपी मोहंमद उर्फ सलीम अब्दुल दोऱजीवाला व आरोपी इब्राहिम मालवला यांनी दारू पिऊन सदानंद शेट्टी यांच्या सोबत वाद झाला तेव्हा आरोपीने सदानंद शेट्टी याच्या पोटात चाकूने भोसकुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून भायखळा पोलीस ठाण्यात आता सेशन केस क्र. ३९२/१९८३ कोर्ट केस क्र. ८०८/p /१९८३ सी आर क्र. ४१४/१९८२ भा. द. वी.कलम ३०७, ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यांची सुनावणी न्यायालयात सुरु होती.आरोपी मोहंमद उर्फ सलीम अब्दुल हा न्यायालयात हजर राहत नव्हता यामुळे न्यायालयाने आरोपीस स्टँडिंग वॉरंट काढले होते. भायखळा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी प्रलंबित आजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी विशेष मोहीम पो. उपा. परी.-३ शशिकांत भोसले यांच्या आदेशानुसार भायखळा पोलीस ठाण्याचे वपोनि सोपान काकड यांच्या मार्गदर्शना खाली पोलिसाचे एक पथक तयार करून फरार आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर आरोपी हा ओरिसा, विशाखापट्टनम, आंध्र प्रदेश या ठिकाणी मासे विक्री करत होता. गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हा पायधूनी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली त्या अनुषंगाने पोलीस पथकाने साध्या वेषात अफझल माऊ हॉटेल, परब चौक, भायखळा( पु ) येथे सापळा लावला व आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत वपोनि सोपान काकड यांच्या मार्गदर्शना खाली पो. उप. नि. नरुटे, एएसआय गोविलकर, मुलाणी, मांजरेकर यांनी कारवाईत भाग घेतला.




