मुकेश भाऊ साळुंके यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा
आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पारधी विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण राबविण्यात यावे अशी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथे मागणी करण्यात आली व प्रकल्प अधिकारी मा अरुण पवार साहेब यांनी मान्य केली व जळगाव जिल्हा पोलिस मुख्यालय येथे पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण सुरू करण्यात आले म्हणून आज दि .८ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटक तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके (Mukesh Bhau Salunke) यांनी सुरू असलेल्या पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ठिकाणी भेट दिली व त्या ठिकाणच्या सोई सुविधा बाबत माहिती घेतली व संबंधित अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून पारधी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावे अशी विनंती केली तसेच जळगाव जिल्ह्यातील ज्या पारधी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटक तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांनी भेट घेऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




