spot_img

Rohit Pawar : पोलिसांनी FIR घेतली नाही, रोहित पवारांनी गाठलं राज ठाकरेंचे शिवतीर्थ

spot_img

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी चौकशी व FIRबाबत मनसेच्या पाठिंब्याची मागणी.

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. या बैठकीत अजित पवारांच्या कथित विमान अपघात प्रकरणातील चौकशी, तसेच पोलिसांकडून एफआयआर नोंदवला जात नसल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्यांनी राज ठाकरेंना अपघात आणि संभाव्य घातपातासंदर्भातील सर्व माहिती सविस्तर दिली. “दादांचा विषय असल्यामुळे त्यांनी तात्काळ वेळ दिला. सुमारे सव्वातास चर्चा झाली. त्यांनी कागदपत्रे आणि तपशील काळजीपूर्वक ऐकून घेतले,” असे ते म्हणाले.

रोहित पवारांच्या मते, राज ठाकरेंनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. अपघाती मृत्यूची नोंद (ADR) झाली असेल, तर एफआयआर का दाखल करण्यात आला नाही? त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निवाड्यांचा दाखला देत, अशा प्रकरणांत एफआयआर घेणे बंधनकारक असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली.

“महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीची तक्रारही नोंदवली जात नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असेही राज ठाकरेंनी सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले. मराठी माणसाला न्याय मिळत नसेल, तर आवश्यक ती भूमिका घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मनसेने पाठिंबा द्यावा, अशी विनंती आपण केली असून,“न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेन,” असे राज ठाकरेंनी सांगितल्याचे रोहित पवारांनी नमूद केले. या भेटीमुळे संबंधित प्रकरणात पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ