spot_img

‘दशावतार’ सिनेमाचा पार्ट 2 येणार ?

spot_img

सिनेमातील अभिनेत्रीनेच केला खुलासा

सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar) या अस्सल मराठी आणि कोकणच्या मातीतल्या कथांशी प्रेरित चित्रपटाने सर्वांनाच वेढ लावलय. खरंतर ‘दशावतार’ ही कोकणातील लोककला असून हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. ज्याच्या माध्यमातून भगवान विष्णूचे विविध अवतार दर्शवले जातात. या अवतार कथा शतकानुशतके कोकणातले कलाकार रंगपीठावर सादर करत आहेत. याच कथेवर आधारित ‘दशावतार’ चित्रपट आहे. कोकणातलं निसर्ग सौंदर्य, संस्कृती आणि तिथल्या परंपरांचं दर्शन घडवणारा हा सिनेमा प्रेक्षकांचा निरोप घेताना मोठा संदेश देतो. तसेच चित्रपटाचे कथानक, कलाकारांची निवड, छायाचित्रण, बोलीभाषेतील गाणी, अभिनय सगळच अव्वल आहे. अशातच आता ‘दशावतार’ सिनेमाचा सिक्वेल येणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनं (Priyadarshini Indalkar) नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘दशावतार’ सिनेमाच्या सिक्वेलबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली की, “बरेच जण असंच म्हणतायेत की ‘दशावतार’चा सीक्वेल यावा. माझी तर खूप इच्छा आहे. सिनेमात बाबुली काका मला हे सांगून जातात की, “भैरवीची वेळ झाली, आता पुढची जबाबदारी तुझी.. तू हा लढा पुढे चालू ठेव..” यावरुन बरेच जण म्हणत आहेत की, पार्ट 2 आला तर त्यात वंदनाची भूमिका मोठी असेल. त्यामुळे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सीक्वेलचा विचार केला तर मी एका पायावर तयार आहे..”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ