Supriya Sule Car Accident : सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात; सुनील माने यांनी केली सखोल चौकशीची मागणी

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मुंबईहून पुण्याकडे प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला मुंबई–पुणे महामार्गावर एका कारने जोरदार बाजूची धडक दिली. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अपघातात गाडीत असलेले सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी दिली.

घटनेनंतर त्यांनी नागरिकांना रस्त्यावर वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले. वेगमर्यादा पाळणे आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते सुनील माने यांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यांनी म्हटलं की, पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याची भावना निर्माण होत आहे. तसेच, संबंधित वाहन गुजरातमधील असल्याचा उल्लेख करत या प्रकरणाची केवळ अपघात म्हणून नोंद न करता सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ