Anjali Damania : रुपाली चाकणकर एसआयटीसमोर हजर; अंजली दमानियांचा मुख्यमंत्री आणि तटकरेंवरही निशाणा!

spot_img

नाशिकमध्ये आज भोंदू अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर आपल्या वकिलांसह एसआयटी (SIT) समोर हजर झाल्या आहेत. या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारवर गंभीर प्रश्नांची सरबत्ती केली असून, केवळ चाकणकरच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि दीपक केसरकर यांचीही चौकशी करण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.

“या प्रकरणाची व्याप्ती पोलिसांनी सांगितलेल्या ९ महिलांच्या चौकशीपेक्षा कितीतरी मोठी असून, सुनील तटकरे यांनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला,” असा थेट आरोप दमानिया यांनी केला आहे. खरातच्या शिवनिका ट्रस्टचे राजकीय लागेबंध आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, तसेच चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली निवड संशयास्पद असल्याचे सांगत दमानिया यांनी नव्या गौप्यस्फोटाचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ