spot_img

Maharashtra Gas Crisis 2026 : आखाती युद्धाचा विळखा महाराष्ट्राच्या पोटाला, गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले

spot_img

व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा खंडित: मुंबईतील ऐतिहासिक हॉटेल्सपासून नागपूरच्या व्हीव्हीआयपी कॅन्टीनपर्यंत सर्वत्र चूल पेटवणे कठीण

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचे गडद सावट आता थेट महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या ताटावर पडू लागले आहे. आखाती देशांतून होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर, सोलापूर आणि धुळे यांसारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपल्याने अनेक नामवंत हॉटेल्सनी ‘गॅस नाही’ असे फलक लावून आपले दरवाजे बंद केले आहेत, तर काही ठिकाणी केवळ इलेक्ट्रिक शेगडीवर चालणारे मर्यादित पदार्थ ग्राहकांना दिले जात आहेत.

मुंबईतील १७८ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेले ‘पंचम पुरीवाला’ हॉटेल सध्या अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहे. ७९ पदार्थांची रेलचेल असलेल्या या हॉटेलमध्ये आता केवळ ‘पुरी-भाजी’ आणि ‘आमरस’ मिळतोय. पुण्याचे प्रसिद्ध ‘बादशाही’ आणि ठाण्यातील ‘शिवम’ हॉटेललाही गॅसअभावी टाळे लागले आहे. नागपूरच्या ‘रवि भवन’मधील मंत्र्यांच्या कॅन्टीनमध्येही गॅस नसल्याने तिथे इलेक्ट्रिक शेगड्यांवर जेवण बनवण्याची कसरत सुरू आहे. नागपूरच्या बॉटलिंग प्लांटमधून व्यावसायिक पुरवठा थांबवून केवळ घरगुती वापराला प्राधान्य दिले जात असल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.

या संकटाचा सर्वाधिक फटका लग्नसराईला बसला असून, केटरर्सनी घेतलेल्या ऑर्डर्सचे ॲडव्हान्स पैसे परत करण्याची वेळ आली आहे. चुलीवर हजारो लोकांसाठी जेवण बनवणे अशक्य असल्याने शेकडो मजुरांचा रोजगार धोक्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमीसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. रत्नागिरीत तर भविष्यातील टंचाईच्या भीतीने नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर पाच-पाच दिवसांच्या रांगा लावल्या आहेत. एकूणच, जागतिक युद्धाच्या ठिणगीने महाराष्ट्रातील जनजीवन आणि अर्थचक्राला मोठा तडा दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ