spot_img

Aamir Khan : अचानक हातात रॅकेट घेऊन मैदानात उतरला आमिर,फॅन्स झाले थक्क

spot_img

आमिर खान (Aamir Khan) कधी काय करेल याचा नेम नसतो. कधी तो अरिजित सिंगसोबत पतंग उडवताना दिसतो, तर कधी अचानक स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये खेळाडू बनून सर्वांना चकित करतो. शनिवारी मुंबईच्या जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये असंच काही पाहायला मिळालं. निमित्त होतं ‘वर्ल्ड पिकलबॉल लीग’ (WPBL 2026) चं. या सोहळ्याला आमिरने हजेरी लावली आणि केवळ हजेरीच लावली नाही, तर त्याने हातात रॅकेट घेऊन तो मैदानातही उतरला. पण खेळता खेळता अचानक असं काही घडलं की मैदानावरील प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.

WPBL च्या दुसऱ्या सीझनचे सेमीफायनल सामने रंगले होते. सेलिब्रिटी म्हणून आलेल्या आमिरने उत्साहाच्या भरात चाहत्यांसोबत दोन सामने खेळायचा निर्णय घेतला. ब्लॅक टी-शर्ट आणि निळ्या पॅंटमध्ये आमिर फिट दिसत होता. खेळ सुरू असताना, समोरून आलेला एक शॉट परतवण्यासाठी आमिर वेगाने पुढे सरसावला. यादरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो कोर्टवर पडला. ६० वर्षांचा सुपरस्टार असा अचानक पडलेला पाहून तिथे उपस्थित असलेले आयोजक आणि चाहते काही क्षणासाठी घाबरले. पण मैदानात पडल्यानंतर, आमिर एखाद्या विशीतल्या तरुणासारखा क्षणार्धात उसळी मारून उठला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही वेदना नव्हती, तर उलट एक मोठी स्माईल होती. त्याने सावरत पुन्हा रॅकेट पकडलं आणि खेळ सुरू केला. पडल्यानंतर ज्या वेगाने तो सावरला, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. कुणी म्हणतंय, “सर, या वयात इतकी एनर्जी आणता कुठून?” तर कुणी थेट त्याच्या डाएटबद्दल विचारलंय. एका चाहत्याने लिहिलंय, “आमिर सर, तुमच्या फिटनेसचं गुपित काय? आम्हालाही सांगा!” वयाची साठी गाठूनही आमिरची ही चपळाई आजच्या पिढीला लाजवणारी आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ