प्रतिनिधी विजय गायकवाड (नवी मुंबई)
नवी मुंबई – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गोपनीय माहिती मिळाली होती की वाशी एपीएमसी मधील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे. त्या अनुषंगाने अ. मा. वा. प्र. कक्षच्या पोलीस पथकाने त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करून त्या ठिकाणी पीडित दोन महिला व लॉज मालक, वेटर यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षचे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांनी प्रसारमाध्यमाना अशी माहिती दिली की, दि २० नोव्हेंबर रोजी आमच्या पथकास अशी गोपनीय माहिती मिळाली की, ए. पी. एम. सी. सेक्टर १९-बी, येथील श्रीनिधी हॉटेल अँड लॉजिंग बोर्डिंग मध्ये लॉज मॅनेजर हा वेश्यागमनासाठी मुली व महिलांना लॉज मध्ये बोलवून ग्राहकांना दाखवून त्या नंतर ग्राहकाने मुलगी पसंद केल्यावर त्या ग्राहकाकडून ५ हजार रू घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने एक बनावट ग्राहक तयार करून त्यास श्री निधी लॉज येथे पाठवण्यात आले.
बनावट ग्राहकाने पोलीस पथकास सांकेतिक इशारा दिल्यानंतर पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन पीडित महिला वेश्यागमनासाठी ठेवलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी लॉज व्यवस्थापक मस्तराम रामरजेही कनोजिया ( २९ ) रा. वाशी, विशाल अवध यादव (२३) रा. श्रीनिधी लॉज व महिला पुरवीणारा सोनू उर्फ साहिल हुसेन मंडल ( २८ ) रा. सरसोळे व लॉज मालक रघु आण्णा यांच्या विरोधात बीएसएन कलम 143(3) 3(4) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपीना २४ नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पुढील तपास एपिएमसी पोलीस करीत आहेत. ही कारवाई सपोआ धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शना खाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे, सपोनि योगेश देशमुख, राजश्री शिंदे, पोउपनि सरिता गुडे, पोलीस कर्मचारी अनिल मांडोळे, ठाकूर, चव्हाण, कोलते, परासूर, चव्हाण, अडकमोल पावडे, भोये व मोहिते यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला.




