Mumbai Local News : मुंबई लोकलमध्ये पुन्हा प्रवाशांचा राडा; व्हायरल व्हिडिओनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

spot_img

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांमध्ये होणारे वाद आता चिंतेचा विषय बनले आहेत. सध्या सोशल मीडियावर चर्चगेट-विरार लोकलमधील एका हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात गर्दीच्या डब्यात दोन गटांमध्ये झालेला वाद थेट मारामारीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, उभे राहण्याच्या जागेवरून किंवा गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच लाथाबुक्क्यांपर्यंत गेला. डब्यातील इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही प्रवासी एकमेकांवर धावून जात असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. हा संपूर्ण प्रकार एका सहप्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, लोकलमधील हिंसाचाराची आणखी एक गंभीर घटना सीएसएमटी-अंबरनाथ मार्गावर घडली आहे. 15 जुलैच्या मध्यरात्री डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले. या घटनेत राजू वाघे आणि साहिल खंदारे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रितेश कनोजिया या प्रवाशासोबत झालेल्या वादातून ही घटना घडली. या सलग घटनांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गर्दीच्या वेळेत सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ