Taratala Construction Site Accident : कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे शेड कोसळले; पाच जणांचा मृत्यू

spot_img

दक्षिण कोलकात्यातील ताराताला ट्रान्सपोर्ट डेपोजवळ घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बांधकाम सुरू असलेल्या एका गोदामाच्या शेडचा अचानक मोठा भाग कोसळल्याने अनेक कामगार आणि कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत तेरा जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले असून त्यापैकी अनेक जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

जखमींपैकी नऊ जणांना तातडीने एसएसकेएम रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी अजूनही 50 ते 55 जण अडकले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात असल्याने बचावकार्य अधिक वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ