Hardik Pandya : हार्दिक पंड्याला मिळाला ‘नॅशनल सक्सेसर’; २०२७ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मास्टर प्लॅन!

spot_img

फिटनेसच्या चिंतेमुळे बीसीसीआयने शोधला पर्याय; सहाय्यक कोच रयान टेन डोशेट यांनी नितीश कुमार रेड्डीच्या नावावर लावले शिक्कामोर्तब

भारतीय क्रिकेट संघासाठी अष्टपैलू (ऑलराउंडर) खेळाडू नेहमीच गेम-चेंजर ठरला आहे. सध्या हार्दिक पंड्या हा टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असला, तरी त्याचा सातत्याने सतावणारा फिटनेस हा संघ व्यवस्थापनासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. याच फिटनेसच्या कारणास्तव त्याला टी-२० चे कर्णधारपद गमवावे लागले होते आणि आता २०२७ च्या एकदिवसीय (ODI) विश्वचषकाचा विचार करता, बीसीसीआयने त्याचा सक्षम पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. ५० षटकांच्या सामन्यात १० ओव्हर गोलंदाजी करणे आणि फलंदाजीत फिनिशरची भूमिका निभावणे हार्दिकसाठी कितपत शक्य होईल, याबद्दल शंका असल्याने टीम इंडियाचे सहाय्यक कोच रयान टेन डोशेट यांनी युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी याला हार्दिकचा ‘नैसर्गिक उत्तराधिकारी’ (नॅशनल सक्सेसर) म्हणून घोषित केले आहे.

सध्या सुरू असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनही हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत २३ वर्षीय नितीश कुमार रेड्डीवर संघ व्यवस्थापनाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयच्या अधिकृत व्हिडिओमध्ये बोलताना रयान टेन डोशेट म्हणाले की, “हार्दिक जेव्हा पूर्णपणे तंदुरुस्त असतो, तेव्हा तो संघात एक वेगळीच उर्जा आणतो. तो एक उत्कृष्ट फिनिशर आणि घातक गोलंदाज आहे, अशी दुहेरी भूमिका निभावणारा खेळाडू मिळणे कठीण असते. परंतु, मागच्या १८ महिन्यांत नितीश कुमार रेड्डीने आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली असून त्याचे शरीर आता अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे हार्दिकचा सर्वोत्तम बॅकअप आणि त्याचा खरा उत्तराधिकारी म्हणून आम्ही नितीशकडे पाहत आहोत.”

२०२७ चा एकदिवसीय वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार असून, तेथील खेळपट्ट्यांवर भारताला किमान तीन दर्जेदार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागेल. अशा वेळी तळाच्या फलंदाजांनाही फलंदाजी करता येणे गरजेचे आहे. याच धोरणांतर्गत टीम इंडिया हर्षित राणा, गुरनूर ब्रार आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यासारख्या गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंना तयार करत आहे. तथापि, हार्दिकसारखी आक्रमक फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करण्याची क्षमता केवळ नितीश कुमार रेड्डीमध्येच दिसत असल्याने, आगामी काळात त्याच्या अष्टपैलू कामगिरीचे सातत्याने विश्लेषण केले जाणार आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत नितीश भारतीय संघाचे संतुलन राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ