Bus Station Robbery : बस स्थानकात प्रवाशांचे दागिणे चोरणारा चोरटा गजाआड

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.१९ जून [ रमेश तांबे ]

नारायणगाव बस स्थानक येथे प्रवाशांचे सोन्याचे दागिणे चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीसांना यश आले आहे. या कारवाई पोलीसांनी १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहेत. अर्जुन कानिफनाथ भोसले वय २७ राहणार धनगर वस्ती,अहिल्यादेवी नगर, ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर हे माहिती देताना म्हणाले की,मीरा गणपत शिंदे वय ४८ राहणार बोरी साळवाडी तालुका जुन्नर जि.पुणे ह्या २८ एप्रिल रोजी दुपारी नारायणगाव बस स्टॅन्ड येथून साळवाडी येथे त्यांच्या घरी जात असताना एसटी बस मध्ये चढताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या पर्समधील २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबत मीरा शिंदे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

तसेच भागवत निवृत्ती घाडगे वय ७५ यांची १.५ तोळे सोन्याची चैन देखील अज्ञात इसमाने चोरून नेली होती.सदर फिर्यादीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार संदिप वारे, अक्षय नवले, अभिमन्यु मोटे. या पथकाने बस स्टॅन्ड व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता,सदर ठिकाणी संशयती इसम आढळून आला त्याची गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेतली असता सदरचा संशयित हा रेकॉर्डवरील बस स्टँड वर चोरी करणारा आरोपी अर्जुन भोसले हा असून त्याच्यावर यापूर्वी विविध प्रकारचे ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून तो अत्यंत सराइत असल्याचे समजले.दि.६ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अर्जुन भोसले हा नाशिक फाटा भोसरी येथे येणार असल्याचे गोपनीय बातमीदारा मार्फत समजल्याने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक तसेच नारायणगाव पोलिस स्टेशन पथक यांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने सदर गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेले एकूण १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. 

सदर कार्यवाही पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधिक्षक शुभमकुमार शर्मा,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीस्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सपांगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर शेटे,पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील,सहाय्यक फौजदार दिपक साबळे,पोलीस हवालदार राजू मोमिन,संदीप वारे,पोलीस शिपाई अक्षय नवले,अभिमन्यू मोटे,महिला पोलीस हवालदार नंदा कदम,सुजाता कदम,सुवर्णा गडगे,,पोलीस शिपाई भारत मोहोळ,टीलेश जाधव,पोलीस हवालदार मंगेश लोखंडे,सत्यम केळकर,सोमनाथ डोके, संतोष भापकर महिला पोलीस शिपाई कविता गेंगजे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ