Deool Band-2 : ‘देऊळ बंद २’च्या यशाला मुख्यमंत्र्यांची दाद; चित्रपटाच्या टीमची देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदिच्छा भेट

spot_img

‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

मुंबईत झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत, समाजातील विविध घटकांना एकत्र जोडण्याची ताकद या चित्रपटात असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील शेतकरी, शहरी तरुण, महिला आणि कुटुंबवत्सल प्रेक्षक अशा सर्व स्तरांतील लोकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्यासह चित्रपटाशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान प्रवीण तरडे यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी चित्रपटावर केलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली प्रशंसा ही संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी ठरली आहे. दरम्यान, ‘देऊळ बंद २’ राज्यभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्समध्ये यशस्वीपणे सुरू असून, अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शो होत आहेत. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई आणि लोकप्रियता कायम असल्याने निर्मात्यांचा उत्साह वाढला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ