Interesting Facts : टी-शर्टमधील ‘T’ चा अर्थ काय? रोज वापरणाऱ्या कपड्याच्या नावामागील रंजक इतिहास

spot_img

टी-शर्ट हा आजच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्व वयोगटांमध्ये वापरला जाणारा पोशाख आहे. मात्र, या कपड्याच्या नावामागे एक रंजक कारण दडलेले आहे. अनेकांना वाटते की ‘टी-शर्ट’मधील ‘T’ हे एखाद्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे, परंतु प्रत्यक्षात त्याचा संबंध कपड्याच्या आकाराशी आहे.

टी-शर्ट सपाट पसरवून ठेवला असता त्याचा आकार इंग्रजीतील ‘T’ अक्षरासारखा दिसतो. याच वैशिष्ट्यामुळे या पोशाखाला ‘टी-शर्ट’ असे नाव देण्यात आले. साधे आणि आरामदायी डिझाइन हे त्याच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण मानले जाते.

आज फॅशन जगतात महत्त्वाचे स्थान असलेला टी-शर्ट सुरुवातीला मात्र अंतर्वस्त्र म्हणून वापरला जात होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार, खाणकामगार आणि नौदलातील कर्मचारी हलका व सोयीस्कर असल्याने त्याचा वापर करत होते. पुढे 1913 मध्ये अमेरिकन नौदलाने त्याचा अधिकृत गणवेशात समावेश केल्यानंतर टी-शर्टची ओळख अधिक व्यापक झाली.

यानंतर हॉलीवूडमधील कलाकारांनी मोठ्या पडद्यावर टी-शर्ट परिधान केल्याने तो तरुणाईच्या फॅशनचा अविभाज्य भाग बनला. कालांतराने या पोशाखाचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले. आज राउंड नेक, व्ही-नेक, पोलो, ओव्हरसाईज आणि ग्राफिक प्रिंटेड अशा अनेक आकर्षक शैलींमध्ये टी-शर्ट फॅशनप्रेमींची पसंती मिळवत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ