ENGW vs INDW 2nd T20i : पहिल्या विजयानंतर भारतीय महिला संघाची नजर मालिका विजयावर; दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडसमोर पुनरागमनाचे आव्हान

spot_img

हरमनप्रीत कौर संघात परतण्याची शक्यता; ब्रिस्टोलमध्ये आज संध्याकाळी रंगणार भारत-इंग्लंड थरार

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दणदणीत सुरुवात केली आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत स्मृती मंधानाने संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळत पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या १८९ धावांच्या आव्हानासमोर इंग्लंडचा डाव १५० धावांवर आटोपला. या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली असून आज ३० मे रोजी ब्रिस्टोल येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात ही आघाडी दुप्पट करण्याची मोठी संधी संघाकडे आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यातून संघात परतणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणारा हा सामना क्रीडाप्रेमींना सोनी स्पोर्ट्स चॅनेल्सवर आणि सोनी लिव्ह या डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ