Dilip Dhotre Injured In Mumbai-Pune Expressway Accident : मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा भीषण अपघात; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गाडीचा चक्काचूर

spot_img

राज ठाकरेंचे निकटवर्तीय गंभीर जखमी; पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते आणि राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी दिलीप बापू धोत्रे यांच्या कारला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जात असताना एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धोत्रे यांच्या आलिशान गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात त्यांच्या छातीला आणि पायाला गंभीर इजा झाली असून, सध्या त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दिलीप धोत्रे हे सोलापूर जिल्ह्यातील मनसेचा मुख्य आधारस्तंभ मानले जातात. विद्यार्थी दशेपासून राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्ष रुजवण्यासाठी मोठे कष्ट उपसले आहेत. त्यांच्या याच निष्ठेमुळे अलीकडेच त्यांची पक्षाच्या ‘नेतेपदी’ वर्णी लागली होती. अपघाताचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पंढरपूरमधील त्यांचे समर्थक आणि मनसे सैनिक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ