Trupati Desai : अशोक खरातविरोधात आणखी गुन्हे दाखल; तृप्ती देसाईंकडून भोंदूबाबाच्या अड्ड्याची पाहणी

spot_img

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अडचणी वाढत असून, त्यांच्या विरोधात आणखी तीन नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचे तसेच लग्न, धार्मिक विधी आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. महिलांकडून मिळालेल्या तक्रारींनंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी गतीने सुरू केली आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई आज मिरगाव दौऱ्यावर असून, त्यांनी खरातच्या फार्महाऊससह शिवनिका संस्थान ईशानेश्वर मंदिराला भेट देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मते, या ठिकाणी असलेल्या भुयारी खोलीत महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा संशय आहे.

देसाई यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत, संपूर्ण टोळीवर मकोका (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ