Sanjay Raut : सातारा मारहाण प्रकरणावरून राजकारण तापले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला

spot_img

साताऱ्यात घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना रस्त्यावर मारहाण झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत संताप व्यक्त केला.

या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा लोकशाहीवर आघात झाला, तेव्हा त्यामागे सत्ताधाऱ्यांचीच भूमिका होती, असा आरोप त्यांनी केला. केवळ आंदोलन करून आणि छाती पिटून काही साध्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राऊत यांनी नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर टीका करत, “जे लोक आज लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करत आहेत, त्यांचेच हात या खुनाने रंगलेले आहेत,” असे विधान केले. त्यांनी साताऱ्यातील घटनेचा संदर्भ देत शिंदे गटावरही निशाणा साधला.

तसेच, “वाघाची कातडं पांघरलेल्या शिवसैनिकांना भाजपच्या मंत्र्यांनी रस्त्यावर मारहाण केली, तेव्हा तुमच्यातला शिवसैनिक कुठे गेला होता?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ