spot_img

Gudhi Padwa Celebration : गिरगावात गुढीपाडव्याची जल्लोषात स्वागतयात्रा; तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

spot_img

बुलेटवर नऊवारीत तरुणी, रस्त्यावर रंगोळीची सजावट; नववर्षाच्या स्वागताला अनोखी रंगत.

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभर उत्साहाचे वातावरण असताना गिरगाव परिसरात विशेष जल्लोष पाहायला मिळाला. गिरगावकर प्रतिष्ठानच्या वतीने पोर्तुगीज चौकातून भव्य स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या शोभायात्रेत तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. विशेष म्हणजे, बाईक रॅलीत सहभागी झालेल्या युवकांसोबत नऊवारी साडी परिधान केलेल्या तरुणींनी बुलेटवर स्वार होत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या पारंपरिक आणि आधुनिकतेच्या संगमामुळे सोहळ्याला वेगळीच आकर्षकता मिळाली. याशिवाय, चौकात काढलेल्या भव्य रांगोळीनेही सणाची शोभा अधिकच खुलवली. संपूर्ण परिसर भगवामय झाला असून, नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

मुंबईसह डोंबिवलीतही गुढीपाडव्याचे पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गुढी उभारणी, शोभायात्रा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत आनंदात केले जात आहे.एकूणच, तरुणाईच्या जोशात आणि परंपरेच्या रंगात न्हालेल्या या उत्सवाने शहरात नवचैतन्य निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ