spot_img

Navi Mumbai : गुढीपाडव्याला हापूसची कमी आवक; अवकाळी हवामानाचा बसला फटका

spot_img

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर APMC फ्रुट मार्केट येथे कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक यंदा मोठ्या प्रमाणात घटली आहे. दरवर्षी या दिवशी सुमारे एक लाख पेट्यांची आवक होत असताना, यंदा केवळ 10 हजार पेट्यांवरच आकडा थांबला आहे. कोकणातील आंबा उत्पादकांना यंदाच्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. परिणामी, बाजारात केवळ 10 टक्केच माल उपलब्ध झाला असून याचा थेट परिणाम किमतींवर होत आहे. हापूस आंब्यांचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघेही चिंतेत आहेत.

तरीही सणाचा उत्साह कायम ठेवत व्यापाऱ्यांनी बाजारात आलेल्या आंब्याची पारंपरिक पद्धतीने पूजा केली आणि स्वागत केले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांनीही मोठ्या उत्साहात खरेदी करत सणाचा आनंद लुटला. एकूणच, कमी आवक असूनही हापूस आंब्याच्या आगमनाने बाजारात सणासुदीची रंगत पाहायला मिळाली, मात्र यंदा त्याची चव थोडी महाग पडणार, हे निश्चित आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ