spot_img

Weather News : राज्यात उन्हाचा जोर वाढला; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

spot_img

विदर्भात पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर, कोकणात उष्ण व आर्द्र हवामानाची शक्यता.

राज्यात मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढत आहे. सध्या कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून काही ठिकाणी ते चाळीशीच्या जवळ पोहोचत असल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात उष्णतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि आर्द्र हवामान राहण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अमरावती येथे आज सर्वाधिक 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला,वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस तापमान चाळीशीच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील इतर भागांमध्येही तापमान सामान्यपेक्षा 2 ते 3 अंशांनी जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे शहरातही गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला असून तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, महिन्याच्या अखेरीस तापमान 40 अंशांच्या पुढे जाऊ शकते. तसेच सांगली येथे 37.4 अंश, सातारा येथे 36.1 अंश आणि नाशिक येथे 36.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातही उष्णतेचा प्रभाव जाणवत असून Parbhani येथे 38.5 अंश तापमान नोंदवले गेले. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धारशिव या भागांमध्येही तापमान 36 ते 38 अंशांच्या दरम्यान राहिले. पुढील काही दिवस दक्षिण महाराष्ट्रातही तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ