spot_img

Ramdas Athawale will not contest Rajya Sabha Election : रामदास आठवलेंचा पत्ता कट भाजपच्या गटात नव्या चेहऱ्याची चर्चा!

spot_img

महायुतीचे ‘मिशन ७’ की धक्कातंत्र? देवेंद्र फडणवीस आणि आठवलेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रणधुमाळीला वेग आला असून महायुतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. ताज्या अपडेट्सनुसार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना यंदा राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आठवलेंचा पत्ता कट झाल्याचे मानले जात असून, त्यांचे पुनर्वसन आगामी काळात राज्य मंत्रिमंडळात किंवा लोकसभेच्या मैदानात केले जाऊ शकते. स्वतः आठवलेंनीही “मला लोकसभा लढवायची आहे” असे संकेत आधीच दिले होते, ज्यामुळे भाजप आता विदर्भातील एका महिला उमेदवाराला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

आज मुंबईत परतताच रामदास आठवले यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सध्याच्या राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली आहे. जरी ही भेट विकासकामांच्या निधीसाठी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी पडद्याआड सातव्या जागेसाठी भाजप काही ‘धक्कातंत्र’ वापरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या वाट्याला सहा जागा सहज येत असल्या तरी, सातव्या जागेसाठी ‘गनिमी कावा’ करून विरोधकांना शह देण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उद्या म्हणजेच ५ मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. १६ मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल स्पष्ट होईल. भाजपकडून चार, तर शिंदे सेना आणि अजित पवार गटाकडून प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असेल. आठवलेंची जागा कोणाकडे जाते आणि भाजप सातव्या जागेसाठी उमेदवार उभा करून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ