spot_img

Bhakti Ratnaparkhi Mother Passes Away : अभिनेत्री भक्ती रत्नपारखीवर मातृशोक; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

spot_img

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचं २२ फेब्रुवारी २०२६ रोजी निधन झाल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे दिली. आईचा हसरा फोटो शेअर करत भक्ती यांनी आपल्या मनातील वेदना शब्दांत मांडल्या.

पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, आई शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या आवडीचं स्वयंपाकाचं काम करत होती आणि घरात आलेल्या पाहुण्यांचं हसतमुखाने स्वागत केल्यानंतर कोणालाही त्रास न देता अचानक देवाघरी गेली. “आई, तू कायम माझ्यासोबत आहेस. तुझा हसरा चेहराच सगळ्यांच्या स्मरणात राहील,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पुढे त्यांनी हेही नमूद केलं की, आई-वडील दोघेही अचानक गेल्यामुळे हा धक्का अजूनही स्वीकारता येत नाही, मात्र त्यांची साथ कायम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भक्ती यांच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सांत्वनपर प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. तसेच माधवी निमकर, कपिल होनराव आणि अद्वैत दादरकर यांनीही कमेंटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, भक्ती रत्नपारखी यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अगंबाई सासुबाई, अगंबाई सुनबाई, तू भेटशी नव्यानं आणि सुख म्हणजे नक्की काय असतं यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून त्या घराघरांत पोहोचल्या आहेत.

या दुःखद प्रसंगी त्यांच्या चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून त्यांना धीर दिला जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ