spot_img

Muralidhar Mohol : जय पवारांनी शेअर केला ‘तो’ धक्कादायक व्हिडिओ; मुरलीधर मोहोळांकडून गंभीर दखल

spot_img

पायलटच्या सीटवर कंपनी मालक झोपल्याचा दावा; २२ पानांच्या प्राथमिक अहवालानंतर संशयाचे धुके अधिक गडद

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना उलटूनही या घटनेतील गूढ कायम आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ शेअर केला असून, यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान चक्क मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे.

या व्हिडिओची तातडीने दखल घेत नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी जय पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहिला असून, या प्रकरणाची योग्य ती दखल घेतली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विमान अपघात चौकशी प्राधिकरणाने (AAIB) २२ पानांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, अपघातावेळी बारामतीमध्ये दृश्यमानता कमी होती आणि विमान आधी झाडावर आदळून नंतर जमिनीवर कोसळले. विशेष म्हणजे, उड्डाणापूर्वी पायलटने मद्यपान केले नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही यापूर्वीच व्हीएसआर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबाबतही आश्वासन दिले असून, विमानसेवा पूर्ववत होताच सर्वांना सुरक्षित आणले जाईल, असे सांगितले. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असताना, आता या नवीन व्हिडिओमुळे अपघातामागे निष्काळजीपणा होता की घातपात, अशा चर्चांना उधाण आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ