spot_img

Gautami Patil News Song : ‘तलास’ चित्रपटातील ‘या गो बायांनो हळद घेऊनशी’ गाण्यात गौतमी पाटील

spot_img

लवकरच ‘तलास’ हा रहस्यमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शीर्षकावरूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटात नेमकं काय दडलं आहे, याची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तलास’मध्ये गुंतागुंतीची मर्डर मिस्ट्री, रहस्यमय घडामोडी आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी उकल अशी थरारक मांडणी पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक उदय गणपत जाधव यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून संवाद लेखन रुपाली कुटे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा विजय गाडेकर यांनी पेलली आहे.

दादरमध्ये गाण्याचा जल्लोषमय सोहळा

दादर क्लब येथे आयोजित भव्य कार्यक्रमात चित्रपटातील ‘या गो बायांनो हळद घेऊनशी…’ या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. या गाण्याला ग्लॅमरस आणि रॉयल टच देण्यात आला आहे. या गाण्यावर लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिने ठेका धरला असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी आपल्या आवाजाने गाण्याला खास रंग दिला आहे.

दमदार कलाकारांची फौज

या चित्रपटात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील अशा कलाकारांचा समावेश आहे. छायांकनाची जबाबदारी सचिन लोखंडे यांनी सांभाळली असून, तांत्रिक टीमही अनुभवी आहे. रहस्य आणि मनोरंजन यांचा मिलाफ असलेला ‘तलास’ प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या गूढ कथानकाची उकल मोठ्या पडद्यावर कशी साकारते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ