spot_img

Ganesh Naik : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारीचा प्रस्ताव; विधानसभेत रंगली जोरदार चर्चा

spot_img

राज्यात “चांदा ते बांदा” बिबट्यांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारी रोजी विधानसभेत झालेली चर्चा विशेष गाजली. वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यात लवकरच बिबट्या सफारी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. बिबट्यांची संख्या वाढणे हे वनविभागाच्या कामगिरीचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाईक म्हणाले की, समाजात दोन प्रवाह आहेत—एकीकडे प्राण्यांचे संरक्षण करणारे, तर दुसरीकडे हल्ल्यांमुळे चिंतित असलेले नागरिक. वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यात, विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात, बिबट्या सफारी उभारण्याचा विचार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना संभाव्य ठिकाणांचा अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या चर्चेदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी उपरोधिक शैलीत प्रश्न उपस्थित केले. थर्मल कॅमेऱ्यांचा वापर कशासाठी होणार, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितले. तसेच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शाब्दिक टोले लगावत, “जिथे महाजन आहेत तिथे बिबटे कसे घुसतील?” असा सवाल त्यांनी केला.

कुंभमेळ्याचा मुद्दा उपस्थित करताच नाईक म्हणाले की, कुंभमेळ्यात बिबट्या घुसला तर संपूर्ण व्यवस्थेवर पाणी फिरू शकते. यावर परब यांनी पुन्हा कोटी करत, “जिथे गिरीश महाजन घुसले आहेत तिथे कोणाची हिम्मत आहे?” असा टोला लगावला. नाईक यांनी उत्तर देताना सांगितले की, कुंभमेळ्यास अजून दीड-दोन वर्षांचा अवधी आहे. आवश्यक त्या उपाययोजना आणि निधी देण्यास सरकार तयार आहे. सध्या बिबट्यांचा प्रश्न राज्यासाठी गंभीर स्वरूप धारण करत असून, ते कुठेही दिसू शकतात अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेमुळे वन्यजीव संवर्धन, पर्यटन आणि सुरक्षाव्यवस्था या तिन्ही मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापल्याचे चित्र दिसून आले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ