spot_img

Ajit Pawar : अजित पवारांच्या मृत्यूचा तपास वेगात; घातपाताच्या शक्यतेचाही सीआयडीकडून शोध

spot_img

२८ दिवसांत महत्त्वाचे धागेदोरे हाती; एएआयबी व डीजीसीए अहवालांची प्रतीक्षा.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणाचा तपास सध्या Crime Investigation Department (सीआयडी) कडून सुरू असून तपासात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी तपासाची दिशा स्पष्ट केली.

पवार कुटुंबाच्या मागणीनंतर राज्य सरकारने केंद्राला पत्र पाठवत सीआयडी चौकशीची शिफारस केली होती. त्यानंतर सीआयडीने तपासाची सूत्रे स्वीकारून गेल्या २८ दिवसांत विविध बाबींची सखोल छाननी केली आहे. अपघातामागे कोणताही गुन्हेगारी कट किंवा घातपात होता का, या मुख्य मुद्द्यावर तपास केंद्रित असल्याचे रामानंद यांनी सांगितले.

तपासाच्या पहिल्या दिवसापासून अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम सुरू असून Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) सोबत सातत्याने समन्वय ठेवला जात आहे. तसेच Directorate General of Civil Aviation (DGCA) कडील अहवाल आणि इतर यंत्रणांचे निष्कर्षही तपासात समाविष्ट केले जाणार आहेत.

जर तपासादरम्यान घातपात, षडयंत्र किंवा अन्य गंभीर बाबी समोर आल्या, तर त्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल आणि न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने या प्रकरणात केंद्रीय संस्थेकडे तपास सोपवण्याबाबतही पत्रव्यवहार केला असल्याचे सांगण्यात आले. तपासात लक्षणीय प्रगती झाली असून पुढील अहवालानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, असे रामानंद यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ