spot_img

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात तपास वेगात; दुपारी ३ वाजता मोठी घोषणा?

spot_img

SID कडून महत्त्वाची पत्रकार परिषद; रोहित पवारांचे गंभीर आरोप.

अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान दुर्घटनेच्या चौकशीला आता लक्षणीय गती मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणासंदर्भात राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) चे अतिरिक्त पोलीस महासंचालक आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार असून, तपासातील काही संवेदनशील आणि महत्त्वाचे तपशील उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी मागील काही दिवसांत या दुर्घटनेबाबत अनेक तांत्रिक मुद्दे मांडत अपघाताच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित विमान हे व्हीएसआर कंपनीचे असल्याचे सांगितले जाते. या कंपनीचे आणि DGCA मधील काही अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

रोहित पवार यांनी या प्रकरणात व्हीएसआर कंपनीसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन तसेच पुण्यातील बारामती पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, त्यांची तक्रार स्वीकारण्यात आली असली तरी अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

अजित पवार यांच्या निधनानंतर ही घटना केवळ अपघात होती की त्यामागे घातपाताचा कोणताही कोन आहे, यावर राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा रंगत आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि कंपनीवर झालेले आरोप लक्षात घेता, आजच्या पत्रकार परिषदेत SID नेमकी कोणती भूमिका मांडते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ