मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज सर्वात धाडसी आणि महान योद्धा होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत केवळ मराठवाड्यातच नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडू या भागांतील सुमारे ३०० ते ३६० किल्ले जिंकले
पुण्याच्या नैऋत्येला 48 किमी अंतरावर अन् भोरच्या बायव्येला 24 किमी अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.याच डोंगरावर मोठ्या थाटात राजगड उभा आहे.
महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या तुलतेन या किल्ल्याचा बालेकिल्ला सर्वात उंच आहे.त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1394 मीटर आहे.
राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत.
त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले.
महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली.
रायगडावर मुख्यत्वे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.