बॉलिवूडमधील दमदार अभिनय, स्पष्टवक्तेपणा आणि हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
कंगनाने आकर्षक हॅन्डलूम साडीतले फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
कंगनाचा पारंपरिक, रुबाबदार आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज पाहून चाहते अक्षरशः भारावून गेले आहेत.
या फोटोंमध्ये कंगनाने नेसलेली हॅन्डलूम साडी तिच्या लुकचे मुख्य आकर्षण ठरली आहे.
विशेष म्हणजे, साडीसोबत तिने परिधान केलेला युनिक डिझाइनचा ब्लाउजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
कपाळावरील टिकली आणि हलका मेकअप यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
या फोटोमध्ये कंगनाने केसात गाजर माळला आहे.
तर कंगनाचा हा लुक तुम्हाला कसा वाटलं हे नक्की कळवा