हिंदू धर्मात, भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

 दर महिन्याला येणारी ही चतुर्थी विशेषतः फलदायी असते, परंतु जेव्हा ती मंगळवारी येते, तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते.

जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला 'अंगारकी चतुर्थी' म्हटले जाते. 

पौराणिक मान्यतेनुसार, अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टींचे फळ मिळते.

मे 2026 ची चतुर्थी 5 मेला मंगळवारी साजरी केली जाणार आहे. चतुर्थी तिथी 5 मे रोजी पहाटे 05:24 वाजता सुरू होईल आणि 6 मे रोजी सकाळी 07:51 मिनिटांनी समाप्त होईल.

संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. 5 मे रोजी मुंबईत चंद्रोदयाची वेळ रात्री १०.१९ च्या सुमारास असेल. चंद्रोदयानंतर चंद्राला नैवध्य देऊनच उपवास सोडावा.

स्कंद पुराणानुसार, अंगारक यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला की, मंगळवारी येणारी चतुर्थी 'अंगारकी' नावाने ओळखली जाईल. 

या दिवशी व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते आणि रखडलेली कामे मार्गी लागतील .5 मे रोजी सकाळी अमृत काळ किंवा शुभ काळात गणपती बाप्पाची पूजा करणे फलदायी ठरेल.

 सकाळी लवकर स्नान करून 'ॐ गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करत बाप्पाची आरास करावी.

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा मंगळाचा जास्त प्रभाव आहे, त्यांनी या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करावी.

यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव शांत होण्यास आणि कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो.