महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो.
महाराष्ट्रासाठी १ मे हा दिवस तसा अनेक अर्थांनी खास आहे. हाच दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत मुंबईसह मराठी भाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेसाठी लोकांकडून आग्रह धरला जात होता.
महाराष्ट्रातही मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची निर्मिती झालीच पाहिजे, अशी मागणी केली जात होती. या लढ्यात अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले.
त्यानंतर मराठी जनतेच्या लढ्यापुढे नमते घेत केंद्र सरकारने आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
कामगारांच्या हक्कांसाठी तसेच कामच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा यासाठी १८८६ साली अमेरिकेतील शिकागो येते कामगारांनी आंदोलन केले.
कामाचे आठ तास असावेत यासाठी हे आंदोलन होते. या आंदोलनालाही यश आले.
या संघर्षाची आठवण म्हणून १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.