ना मोठा सोहळा, ना गाजावाजा! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा साधेपणाने विवाहसोहळा पडला पार
बॉलिवूड अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर आणि दिग्दर्शक शरण शर्मा अडकले विवाहबंधनात
घरच्या घरी साधेपणात पार पडलेल्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
आकांक्षा रंजन कपूर आणि चित्रपट दिग्दर्शक शरण शर्मा यांनी ट्रेंड मोडत अगदी साधेपणात केला विवाह
जड लेहेंग्याऐवजी तिने सोनेरी नक्षीकाम असलेली लाल रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती
त्यावर पारंपरिक दागिने, लाल बांगड्या आणि हातावरील मेहंदीने तिचा लूक खुलून दिसत होता
शरण शर्माने पांढरा कुर्ता-पायजमा आणि भरतकाम केलेले नेहरू जॅकेट परिधान करून साधा पण आकर्षक लूक साकारला
या फोटोंना तिने भावूक कॅप्शन दिलं, “जेव्हा तू नसतोस, तेव्हा घर घरासारखं वाटत नाही… जेव्हा तू असतोस, तेव्हा मला कसलीही भीती वाटत नाही.”
तिच्या या पोस्टवर आलिया भट्ट, के. एल. राहुलसह अनेक बॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला
या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते
तर आकांक्षा रंजन कपूरचा विवाहसोहळ्याचा हा लुक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा
अभिनेत्री गिरीजा ओकने पुन्हा एकदा तिच्या मनमोहक आणि सुंदर लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.