अभिनेत्री गिरीजा ओकने पुन्हा एकदा तिच्या मनमोहक आणि सुंदर लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पिवळ्या साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.
ऑरा बनारस या ब्रँडची ही हँडक्राफ्टेड कोरा सिल्क बनारसी साडी गिरीजाने नेसली आहे.
पानाफुलांची डिझाइन असलेली ही साडी अत्यंत साधी आहे, पण त्यातही गिरीजाचं सौंदर्य खुललं आहे.
या साडीवर गिरीजाने लाँग स्लिव्ह ब्लाऊज आणि मॅचिंग कानातले घातले आहेत. केस मोकळे सोडून त्यावर तिने मिनिमल मेकअप केला आहे.
अभिनेत्री गिरीजा ओकच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इन्स्टाग्रामवर या फोटोंवर 41 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा…
Check It Out