spot_img

Israel Iran War : इराणच्या अडचणीत वाढ! आता आखाती देशांनीही उघडला मोर्चा; ट्रम्प यांच्याकडे केली मोठी मागणी

spot_img

*गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धात इराण पूर्णपणे कोंडीत सापडला असून, सौदी अरेबिया आणि यूएईसह सहा देशांनी इराणचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने पश्चिम आशियात खळबळ माजली आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाने आता एक भयंकर वळण घेतले आहे. इस्रायल आणि अमेरिका यांच्याशी दोन हात करणाऱ्या इराणसमोर आता नवीन संकट उभे ठाकले आहे. गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात इराणचे अतोनात नुकसान झाले असून, सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांचा खात्मा झाला आहे. तरीही इराणने माघार न घेता अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांचा सर्वाधिक फटका दुबईला बसला असून तिथे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे, कारण इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) हा समुद्री मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. जगाच्या एकूण गरजेपैकी सुमारे २५ टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गावरून होते. हा मार्ग बंद झाल्याने जगभरात इंधनाचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मार्ग खुला करण्यासाठी युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले होते, मात्र सुरुवातीला त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

परंतु आता परिस्थिती बदलली आहे. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) मधील सहा देश— सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (UAE), कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन आता उघडपणे इराणच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, या आखाती देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट निरोप दिला आहे की, हे युद्ध अर्धवट सोडू नका. इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे नष्ट होईपर्यंत हा लढा सुरू ठेवावा, अशी मागणी या देशांनी केली आहे. यामुळे इराण आता एकाकी पडला असून त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ