महागड्या शॅम्पू आणि पार्लर ट्रिटमेंटला म्हणा गुडबाय; घरगुती जादूने दूर होईल कोंडा आणि केस गळती
आजच्या धकाधकीच्या जीवनात चुकीचा आहार, वाढते प्रदूषण आणि मानसिक ताण यामुळे केसांच्या समस्या घरोघरी पाहायला मिळतात. मग तो केसांचा कोरडेपणा असो, कोंडा असो किंवा अकाली पांढरे होणारे केस. अनेकदा आपण जाहिरातींना भुलून केमिकल्युक्त उत्पादने वापरतो, पण त्यांचा परिणाम तात्पुरता असतो. खरे तर, केसांच्या आरोग्याचे रहस्य निसर्गात दडलेले आहे. शरीरातील मेलानिन (Melanin) कमी झाल्यामुळे किंवा Vitamin B12 च्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात. अशा वेळी महागड्या रसायनांऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.
केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी आणि नैसर्गिक चमक मिळवून देण्यासाठी नुपूर मेहंदी आणि दही यांचे मिश्रण अत्यंत प्रभावी ठरते. मेहंदीमध्ये असणारी प्रथिने आणि जीवनसत्त्वे केसांना पोषण देतात, तर दह्यातील लॅक्टिक ऍसिड आणि कॅल्शियम कोंड्याचा नायनाट करून टाळूला (Scalp) आर्द्रता पुरवतात.
कशी तयार कराल ही ‘मॅजिक रेसिपी’?
१. एका भांड्यात आवश्यकतेनुसार दही घ्या.
२. त्यात नुपूर मेहंदी पावडर मिसळून एक मऊ पेस्ट तयार करा.
३. ही पेस्ट केसांना आणि मुळांना व्यवस्थित लावून ३० मिनिटे ते १ तास ठेवा.
४. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवून टाका.
या नैसर्गिक उपायाचे फायदे:
मेहंदी आणि दह्याचे मिश्रण केसांचे तुटणे थांबवते आणि त्यांना जाड बनवते. दह्यातील अँटी-फंगल गुणधर्म कोंड्याची समस्या मुळापासून संपवतात.यामुळे केस मऊ, मुलायम आणि चमकदार होतात. नैसर्गिक रंगद्रव्य टिकवून ठेवण्यास हे मिश्रण मदत करते.
केवळ बाह्य उपचारच नाही, तर हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि पुरेशी झोप यांसारख्या चांगल्या सवयी अंगीकारल्यास तुमचे केस कायमचे निरोगी राहू शकतात. जर तुम्हालाही केस गळतीचा त्रास असेल, तर हा स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय नक्की करून पहा!




