प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव ही आदित्य ठाकरे यांची खरी ओळख आहे.

13 जून 1990 ही आदित्यठाकरे यांची जन्म तारीख. वडील उद्धव ठाकरे आणि आई रश्मी ठाकरे.

आदित्य यांचं माहीमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून शालेय तर सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीपर्यंतच शिक्षण झालं आहे.

तेजस ठाकरे हे आदित्य ठाकरे यांचे लहान बंधू आहेत.

ठाकरे घराणं आणि कला हे एकप्रकारचं रक्ताचं नातं आहे. कलेचा हा वारसा आदित्य यांच्याकडेही आला आहे.

आदित्य एक चांगले कवी आणि गीतकार आहेत.त्यांच्या इंग्रजी कवितांचा ‘माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. 

2010च्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेनेची घोषणा केली. यावेळी हजारो लोकांच्या साक्षीने बाळासाहेबांनी आदित्य यांच्याकडे युवा सेनेची जबाबदारी सोपवली. 

 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रीपद देण्यात आलं. 

एकाच मंत्रिमंडळात बाप मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असण्याची राज्यातील ही पहिलीच घटना होती.

बॉलिवूडमधील दमदार अभिनय, स्पष्टवक्तेपणा आणि हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे.