spot_img

Nashik News : पंचवटी एक्सप्रेसमध्ये रमजाननिमित्त इफ्तार; प्रवासी संघटनेचा अनोखा उपक्रम

spot_img

मनमाड ते मुंबई प्रवासात रोजा सोडण्याचा कार्यक्रम;

मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसने 51 व्या वर्षात प्रवेश केला असताना रमजान महिन्याच्या निमित्ताने या गाडीत इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासी संघटनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक आणि कसारा येथून अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी एकत्र येत सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी प्रार्थना करून रोजा सोडला. या प्रसंगी जगात शांतता प्रस्थापित व्हावी तसेच ईराण आणि इस्रायलमधील तणाव कमी व्हावा यासाठीही प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरणात देशभक्ती आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ झाली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ